Aslam Abdul Shanedivan
मोरिंगा म्हणजेच शेवगा अशी जादुई वनस्पती आहे. जी आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते.
मोरिंगाच्या पानांमध्ये आणि त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.
मोरिंगातील व्हिटॅमिन ए पेशींच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते तसेच त्वचेच्या ऊतींची निर्मिती आणि दुरुस्ती करण्यात मदत करते.
मोरिंगातील व्हिटॅमिन ए हे त्वचेतील कोलेजन वाढीस प्रोत्साहन देते. यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. त्वचेची चमक कायम राहते.
मोरिंगातील व्हिटॅमिन सी रंगद्रव्य कमी करण्यासह त्वचेचा टोन आणि मुरुमांच्या समस्या कमी करण्यास मदत करते. यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात. त्वचा हायड्रेट होऊन ग्लो वाढतो.
मोरिंगामध्ये झिएटिन आणि क्वेर्सेटिनसारखे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.
मोरिंगा हे अमीनो आणि ओलेइक ऍसिडचे समृद्ध स्त्रोत असून त्वचेवर ओलावा टिकवून ठेवते. ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार, मऊ आणि निरोगी दिसते. (उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)