sandeep Shirguppe
दूध आणि केळी एकत्र खाल्ल्यास शरीराला पोषकतत्त्वे मिळतात का? वजन वाढीसाठी याचा फायदा होतो का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार केळी व दूधाचे मिश्रण योग्य नाही.
दूध प्रोटीन, जीवनसत्त्व आणि रायबोफ्लेविन, जीवनसत्त्व बी १२ सारखे खनिजाचे स्त्रोत आहे.
दुसरीकडे केळी व्हिटॅमिन बी ६, मॅग्निज, व्हिटॅमिन सी, डायटरी फायबर, पोटॅशियम यासारखे घटक असतात.
जास्त कार्बोहायड्रेट असणारे हे फळ व्यायामाच्या अगोदर आणि नंतरचा एक चांगला स्नॅक्स मानला जातो.
दूध आणि केळीचे मिश्रण अनेकजण खातात, कारण दूध आणि केळीतून एकत्रीत पोषक घटक मिळतात.
अभ्यासांनुसार केळी आणि दूध एकाच वेळी खाण्याने पचन यंत्रणेबरोबरच सायनसही प्रभावित होते.
दूध-केळी एकत्र खाल्ल्याने पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतात. यामुळे काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.