Mahesh Gaikwad
शेवगा जेवणामध्ये खायला जितका चविष्ट असतो, तितकाच आरोग्यासाठी लाभदायक असतो. शेवग्याच्या शेंगा, पाने आणि फुले संपूर्ण शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन-सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
शेवग्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस या सारखे घटक असतात, ज्यामुळे हाडे बळकट होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे अन्न पचनास मदत करते. यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.
शेवग्यामध्ये असलेले क्वेर्सेटिन आणि क्लोरेजिक अॅसिड रक्तदाब आणि साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
नियमित शेवग्याचे सेवन केल्यामुळे त्वचा चमकदार होते. तसेच केस गळती कमी होते.
शेवग्याच्या सेवनामुळे पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी अनावश्यक खाणे टळते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
शेवग्याची भाजी, सूप, चहा, किंवा पानांची पावडर पाण्यात घालून सेवन करू शकता. अशा विविध स्वरूपात शेवग्याचा आहारात समावेश करू शकता.