Team Agrowon
महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये बऱ्याच जमिनी हलक्या बरड असल्याने पडीक आहेत अशा जमिनीत शेवग्याची लागवड निश्चितच फायदेशीर ठरू शकते.
शेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते.
चांगल्या शेंगेची लांबी ५० ते ६० सें.मी., भरपूर गराची असते. कडवट चवीच्या शेंगेस दर मिळत नाही. शेंगा काढल्यानंतर त्याचा तजेला २-३ दिवस टिकून राहावा.
झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत. दोन झाडांच्या ओळीत वखरणी केल्यास तणांचा उपद्रव होत नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरेल.
लागवडीनंतर दोन ते अडीच महिने किंवा मुख्य खोड ३ ते ४ फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी.
दर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यांत शेंगा निघाल्यावर छाटणी केल्यास झाड नियमित उत्पादन देते.
घराच्या अंगणात पाठीमागे शेवगा लावल्यास फार जोमाने वाढतो. त्याला खतही मिळते. शिवाय सांडपाणी दिल्यास ते अधिक दुप्पटीने वाढते. सहज पीक येते आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळते.
Frampond Management : शेततळं खोदताना जागेची निवड कशी कराल?