Aslam Abdul Shanedivan
शेवग्याच्या शेंगा ही एक उत्तम आणि पौष्टीक भाजी असून यात अनेक औषधी गुणधर्म असतात
शेवगा औषधी गुणांसाठी ओळखली जात असून ती व्हिटामीन, खनिज, अँटी ऑक्सिडेंट्सने परिपूर्ण असते
शेवग्याच्या शेंगा सांधेदुखीच्या वेदना दूर करण्यासह ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते
शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामीन ए, सी, बी-२, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि झिंक असते. तर यात १८ अॅमिनो अॅसिड्स देखील असतात.
शेवग्याच्या शेंगांमधील फायबर्समुळे पचनक्रिया चांगली राहते. यामुळे गॅस, पोट फुगण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामीन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्याबरोबरच हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात येण्याबरोबरच वजन कमी होण्यासही मदत होते. तसेच बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो