sandeep Shirguppe
व्हिटॅमिन्ससाठी व्हिटॅमिनयुक्त आहार घेणं गरजेचं असतं. यापैकी अत्यंत महत्वाचं असं व्हिटॅमिन ए.
Vitamin A ची निर्मिती शरीर करत नसल्याने त्यासाठी व्हिटॅमिन ए युक्त आहार घेणं गरजेचं आहे.
एका मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये जवळपास 900 mcg व्हिटॅमिन A उपलब्ध असतं. याचा त्वचेसाठी फायदा होतो.
गाजराचं सेवन केल्यास अँटिऑक्सिडंट्स त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करतात.
रोजच्या जेवणासाठी वापरला जाणारा टोमॅटो हा देखील व्हिटॅमिन एचा एक चांगला स्त्रोत आहे.
आंबा सिझनेबल फळ आहे परंतु मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए तसचं व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढणारे अँटी ऑक्सिडंट्ल आढळतात.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळतं. तसचं या भाज्यांमध्ये इतरही अनेक व्हिटॅमिन आणि खनिजं आढळतात.
सिमला मिरची हे व्हिटॅमिन एचं एक समृद्ध स्त्रोत आहे. तसचं यात व्हिटॅमिन सी देखील असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदा होतो.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळतं. तसचं यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम, आयरन उपलब्ध असतं.