sandeep Shirguppe
रोजच्या आहारामध्ये समाविष्ट असणारी मूग डाळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे.
मूग डाळीमध्ये प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी-6, नियासिन, थायामिन आणि फोलेट आढळते.
वजन कमी करण्यासाठी आहारात मूग डाळीचा समावेश करा. मूग डाळीत कमी कॅलरीज असतात.
मूग डाळीमध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करते.
मुगातील लोह अशक्तपणापासून बचाव करण्यास मदत करते. याचा गर्भवती महिलांना गर्भाच्या वाढीस पूरक फायदा होतो.
मूग डाळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम पुरेसे प्रमाणात असते, त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मूग डाळीचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते.
मूग डाळीमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते, यामुळे भूक नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.