Anuradha Vipat
खालील टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा मेकअप पावसातही परफेक्ट ठेवू शकता.
मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहऱ्यावर २ मिनिटे बर्फ चोळा, यामुळे ओपन पोअर्स बंद होतात आणि घाम येत नाही.
ऑइल-फ्री किंवा मॅट प्राइमर वापरा, जेणेकरून पावसाच्या दमट हवेतही मेकअप चेहऱ्यावर टिकून राहील.
पावसाळ्यात जड फाउंडेशन लावणे टाळा. त्याऐवजी वॉटरप्रूफ बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम वापरा.
डोळ्यांचा मेकअप वाहून जाऊ नये म्हणून नेहमी 'वॉटरप्रूफ' आणि 'स्मजप्रूफ' मस्करा आणि आयलायनर वापरा.
क्रीम ब्लशऐवजी पावडर ब्लश वापरा. लिपस्टिकसाठी ट्रान्सफर-प्रूफ मॅट लिक्विड लिपस्टिक उत्तम पर्याय आहे.
मेकअप पूर्ण झाल्यावर शेवटी मॅट फिनिशिंग देणारा 'मेकअप सेटिंग स्प्रे' नक्की मारा.