Anuradha Vipat
मस्त, कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुकसाठी पावसाळ्यात शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप्स हा सर्वोत्तम कॅज्युअल पर्याय आहे.
कॉटन, नायलॉन किंवा पॉलिस्टर मिक्स फॅब्रिकचे शॉर्ट्स आणि क्रॉप टॉप वापरा. हे कपडे पावसात भिजले तरी लवकर सुकतात.
पावसाळ्यात डेनिम ओले झाल्यावर जड होते आणि सुकायला वेळ लागतो. त्यामुळे कॉटन किंवा सिंथेटिक शॉर्ट्स निवडा.
पावसाळ्यातील लहरी आणि गडद हवामानात पिवळा, गुलाबी, निळा किंवा ऑरेंज रंगाचे क्रॉप टॉप्स तुम्हाला फ्रेश लुक देतात.
जास्त घट्ट कपडे घालणे टाळा. लूझ फिटिंग क्रॉप टॉप्स आणि हाय-वेस्ट शॉर्ट्सचे कॉम्बिनेशन खूप कम्फर्टेबल वाटते
पावसाळ्यात स्टायलिश क्रॉप्स रबर सँडल्स किंवा फ्लिप-फ्लॉप्स वापरा.
पावसाळ्यात मोकळे केस ठेवण्याऐवजी हाय पोनीटेल किंवा मेसी बन बनवा