Anuradha Vipat
पावसाळ्याच्या थंड आणि आल्हाददायक वातावरणात गरमागरम आणि कुरकुरीत भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते.
यंदाच्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा 'शेजवान चटणीसोबत गरमागरम मका भजी'.
१ कप मक्याचे दाणे , ४ चमचे बेसन , २ चमचे तांदळाचे पीठ , १ मध्यम कांदा ,२-३ हिरव्या मिरच्या ,बारीक चिरलेली कोथिंबीर, आधा चमचा ओवा आणि हळद, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
एका भांड्यात जाडसर वाटलेला मका, बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, मिरची आणि कोथिंबीर एकत्र करा.
त्यात ओवा, हळद आणि मीठ घालून थोडे थोडे पाणी टाकत घट्ट मिश्रण तयार करा.
कढईत तेल कडकडीत गरम करा आणि मंद आचेवर भजी सोनेरी रंगावर कुरकुरीत तळून घ्या.
गरमागरम मका भजी तिखट-गोड शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.