Anuradha Vipat
पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील दमटपणा वाढल्यामुळे त्वचा तेलकट, चिपचिपी आणि निर्जीव बनू लागते.
पावसाळ्याच्या या ऋतूत त्वचेचा तजेलदारपणा आणि फ्रेशनेस टिकवण्यासाठी नेहमीपेक्षा थोडी वेगळी काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्यात हवेतील दमटपणामुळे चेहऱ्यावर जास्त तेल आणि घाम जमा होतो. यासाठी ऑईल-फ्री किंवा सौम्यफेसवॉशने चेहरा दिवसातून किमान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवा.
अनेकांना वाटते की पावसाळ्यात ऊन नसल्यामुळे सनस्क्रीनची गरज नाही. परंतु, ढगांमधूनही सूर्याची हानिकारक अतिनील किरणे त्वचेपर्यंत पोहोचतात आणि त्वचेचे नुकसान करतात.
पावसाळ्यात हवा जरी दमट असली तरी त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे अत्यंत आवश्यक असते.
पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे मृत त्वचा लवकर जमा होते. आठवड्यातून एकदा हलक्या हाताने चेहऱ्याला स्क्रब करा.
पावसाळ्यात हवा थंड असल्याने तहान कमी लागते, पण शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि त्वचेचा नॅचरल ग्लो राखण्यासाठी रोज ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.