Anuradha Vipat
सणासुदीच्या काळात पारंपरिक कपड्यांमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कपड्यांचे योग्य फॅब्रिक आणि योग्य ॲक्सेसरीजची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
साध्या कपड्यांनाही योग्य पद्धतीने कॅरी करून तुम्ही सणांमध्ये 'इंडो-वेस्टर्न' किंवा 'रॉयल क्लासिक' लुक मिळवू शकता.
पारंपरिक लेहेंगा किंवा शरारासोबत नेहमीच्या ब्लाउजऐवजी क्रॉप टॉप, पेपलम टॉप किंवा एखादा स्टायलिश केप वापरून तुम्ही आधुनिक लुक मिळवू शकता.
पैठणी किंवा सिल्क साडीसोबत नेहमीच्या डिझाईनऐवजी हाय-नेक, बोट-नेक किंवा कोपरपेटी ब्लाउज वापरा.
सणांसाठी ऑर्गनझा , चिफॉन, सिल्क किंवा जॉर्जेट अशा हलक्या आणि चमकदार फॅब्रिक्सची निवड करा.
जर कपडे हेवी वर्कचे असतील तर दागिने अगदी नाजूक घाला. कपडे साधे किंवा प्लेन असतील, तर त्यावर ऑक्सिडाइज्ड झुमके किंवा एखादा मोठा चोकर नेकलेस घालून लुक हायलाइट करा.
आजकाल सिमेट्रिकल कट्स असलेले, एका बाजूला बटन्स असलेले किंवा काउल कुर्ता खूप ट्रेंडमध्ये आहेत.