Anuradha Vipat
पावसाळा हा अनेकांना आवडणारा ऋतू असला तरी या काळात संसर्गजन्य आजार आणि पचनाशी संबंधित समस्या वाढण्याचा धोका असतो.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नेहमी स्वच्छ किंवा उकळून थंड केलेले पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
आहारात व्हिटॅमिन C, फळे, भाज्या, हळद, आले आणि तुळशीचा समावेश करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
पावसाळ्यात उघड्यावर मिळणारे अन्न दूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरचे ताजे आणि स्वच्छ अन्न खाणे अधिक सुरक्षित ठरते.
डेंग्यू आणि मलेरियापासून बचावासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका आणि डासप्रतिबंधक उपाय वापरा.
हात वारंवार साबणाने धुवा, ओले कपडे लगेच बदला आणि शरीर कोरडे ठेवा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर पाय स्वच्छ धुवून कोरडे करा. सतत ओलसर राहिल्याने बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.