Monsoon Health Tips : पावसाळ्यात पालेभाज्या खाण्यापूर्वी 'हे' ५ नियम नक्की वाचा; आरोग्य राहील सुरक्षित

Anuradha Vipat

प्रादुर्भाव

पावसाळ्यात पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी या दिवसांत त्यांच्यावर बॅक्टेरिया आणि कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो.

Monsoon Health Tips | agrowon

विशेष काळजी

पावसाळ्यात पालेभाज्या खाताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून पोटाचे विकार टाळता येतील.

Monsoon Health Tips | agrowon

मीठ किंवा विनेगर

पालेभाज्या धुताना मीठ किंवा पांढरे विनेगर टाका. या पाण्यात भाज्या १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने ३-४ वेळा धुवून घ्या.

Monsoon Health Tips | agrowon

कच्च्या भाज्या किंवा सॅलड

पावसाळ्यात पालेभाज्या कधीही कच्च्या खाऊ नका. कच्च्या पालेभाज्यांमुळे फूड पॉयझनिंग, टायफॉइड किंवा डायरिया होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

Monsoon Health Tips | agrowon

भाज्या शिजवून किंवा वाफवून घ्या

पालेभाज्या नेहमी चांगल्या शिजवून किंवा उकळत्या पाण्यात वाफवून घ्याव्यात.

Monsoon Health Tips | agrowon

कीड लागलेली आणि सडलेली पाने

भाजी निवडताना प्रत्येक पान नीट तपासा. काळी पडलेली, सडलेली किंवा छिद्र असलेली पाने फेकून द्या आणि फक्त ताजी पानेच वापरा.

Monsoon Health Tips | agrowon

ताजी भाजी

पावसाळ्यात पालेभाज्यांची भाजी ताजी असतानाच खावी. शिजवलेली भाजी जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात.

Monsoon Health Tips | agrowon

Radish Leaves Benefits : मुळ्याची पाने फेकण्यापूर्वी हे नक्की वाचा; फायदे जाणून थक्क व्हाल

Radish Leaves Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...