Anuradha Vipat
मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आहार, स्वच्छता आणि काळजीविषयी महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
मुलांच्या आहारात ताजी फळे, भाज्या, डाळी, दूध, दही आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मुलांना नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिण्यास द्या.
रस्त्यावर मिळणारे उघडे खाद्यपदार्थ दूषित असू शकतात. त्यामुळे शक्यतो घरचे ताजे आणि स्वच्छ अन्नच द्यावे.
जेवणापूर्वी हात धुण्याची सवय लावा. बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवायला सांगा.
मुलं पावसात खेळून आल्यावर ओले कपडे त्वरित बदला. शरीर आणि केस नीट कोरडे करा.
डेंग्यू आणि मलेरियाचा धोका टाळण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. मच्छरदाणी किंवा डासप्रतिबंधक उपाय वापरा.