Mahesh Gaikwad
पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणातील बदलांमुले लहान मुले वारंवार आजारी पडतात. त्यामुळे या दिवसांत मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
या दिवसात गरम पाणी, घरगुती सूप, तुळस-आले टाकलेला काढा लहान मुलांना देणे फायदेशीर असते. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.
मुलांच्या आहारात ताज्या पालेभाज्या, गाजर, भोपळा, टोमॅटो, आणि हंगामी फळांचा समावेश करावा. यामुळे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्सची कमी भरून निघते.
लहान मुलांसाठी हळदयुक्त दूध, तुळशीचा काढा हे नैसर्गिक रोगप्रतिकारक टॉनिक आहेत. रोजच्या यांचा समावेश करा.
याशिवाय लहान मुलांनी दररोज किमान ८–१० तास झोप घेणे आवश्यक आहे. पूर्ण झोप न झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते.
पावसाळ्याच्या दिवसांत घराची फसफाई महत्त्वाची आहे. बाहेरून आल्यानंतर, जेवणापूर्वी आणि शौचालयानंतर स्वच्छ हात धुण्याची सवय लावा.
बऱ्याचदा पावसात भिजल्यामुळे आजारी पडतात. त्यामुळे मुले पावसात भिजल्यास लगेच त्यांचे कपडे बदलावेत आणि त्यांना कोरडे करून उबदार कपडे घालावेत.
आवळा, गिलोय, च्यवनप्राश यासारखे नैसर्गिक उपाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.