Monsoon Update : मॉन्सूनचा सुखद धक्का ; यंदा वेळेआधीच केरळात एन्ट्री

Mahesh Gaikwad

उष्णतेची लाट

देशातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा सामना सामान्यांना करावा लागत आहे. सुर्याच्या आग ओकणाऱ्या उष्णतेमुळे नागरीक हैराण झाले आहेत.

Monsoon Update | Agrowon

उष्माघात

वाढत्या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. असे असताना याच दरम्यान देशातील सामान्य नागरीक आणि विशेषत: शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे.

Monsoon Update | Agrowon

हवामान विभाग

देशात यंदा ३१ मे रोजी मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.

Monsoon Update | Agrowon

मॉन्सून दाखल

मात्र, मॉन्सूनने सर्वांनाचा सुखद धक्का देत नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

Monsoon Update | Agrowon

तापमानात घट

हवामान विभागाने या संदर्भातील माहिती दिली आहे. मॉन्सूनने वेळे आधीच एन्ट्री घेतल्यामुळे वाढत्या तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.

Monsoon Update | Agrowon

पाऊस पडण्याची शक्यता

दरम्यान, देशात मॉन्सून दाखल झाल्यानंतर येत्या पाच दिवसांमध्ये उत्तर-पूर्व भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon Update | Agrowon

मॉन्सूनचा पाऊस

देशातील सध्याचा तापमानाचा पारा पाहता मॉन्सूनच्या आगमनाचे वृत्त सर्वांसाठी आनंददायी आहे.

Monsoon Update | Agrowon

पावसाचा अंदाज

यंदाच्या मॉन्सून हंगामात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच दिला आहे.

Monsoon Update | Agrowon