Anuradha Vipat
पावसाळा या ऋतूत फॅशन करताना केवळ स्टाइलच नाही तर आराम आणि सुरक्षिततेचाही विचार करणे गरजेचे असते.
पावसाळ्यात कॉटनपेक्षा पॉलिस्टर, रेयॉन किंवा क्विक-ड्राय फॅब्रिकचे कपडे अधिक सोयीस्कर ठरतात.
पावसामुळे कपड्यांवर चिखलाचे डाग पडू शकतात. त्यामुळे गडद रंग निवडणे फायदेशीर ठरते.
खूप लांब पॅन्ट, पलाझो किंवा मॅक्सी ड्रेस पावसात भिजू शकतात. त्यामुळे अँकल-लेंथ किंवा नी-लेंथ कपडे अधिक योग्य ठरतात.
पावसाळ्यात लेदर शूज टाळावेत. वॉटरप्रूफ सँडल्स, रबर फ्लोटर्स किंवा अँटी-स्लिप फूटवेअरचा वापर करावा.
जड दागिने आणि महागड्या अॅक्सेसरीज पावसात खराब होऊ शकतात.
मोबाइल, पाकीट आणि इतर आवश्यक वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ बॅग किंवा बॅग कव्हर वापरणे फायदेशीर ठरते.