Anuradha Vipat
निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी नेहमी मोठे बदल करण्याची गरज नसते.
सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी पिण्याची सवय शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते .
दररोज फक्त 20 ते 30 मिनिटे चालणे, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने फिटनेस सुधारू शकतो .
दैनंदिन हालचाली वाढवण्यासाठी शक्य असेल तेव्हा जिन्यांचा वापर करा.
आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
मोबाइल, टीव्ही आणि संगणकाचा अति वापर डोळे, झोप आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.
व्यस्त दिनचर्येतून काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. वाचन, संगीत किंवा फिरणे यांसारख्या गोष्टी मन प्रसन्न ठेवतात.