Dry Skin Care Tips : पावसाळ्यात कोरडी त्वचा पडतेय पांढरी? 'हे' घरगुती मलम नक्की ट्राय करा!

Anuradha Vipat

त्वचा

पावसाळ्यात हवेतील आर्द्रत वाढूनही काही जणांची त्वचा कोरडी, निस्तेज आणि पांढरी पडू लागते.

Dry Skin Care Tips | Agrowon

मलम

या ऋतूत महागड्या आणि केमिकल कॅप्सूल युक्त क्रीम्स वापरण्याऐवजी तुम्ही घरीच १००% नैसर्गिक आणि प्रभावी मलम बनवू शकता.

Dry Skin Care Tips | Agrowon

कोरफडीचे जेल, बदाम आणि ग्लिसरीन

वाटीत कोरफडीचे जेल घ्या. त्यात बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई ऑईल एकत्र करा. हे मिश्रण चमच्याने तोपर्यंत फेटा जोपर्यंत त्याचा रंग पांढरा आणि पोत मलमासारखा होत नाही.

Dry Skin Care Tips | agrowon

कोमट पाण्याचा वापर

पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा. गरम पाण्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जाते.

Dry Skin Care Tips | Agrown

ओल्या त्वचेवरच मलम किंवा मॉइश्चरायझर

आंघोळ केल्यावर त्वचा किंचित ओलसर असतानाच वरील घरगुती मलम किंवा लॅक्टो कॅलामाइनसारखे सौम्य मॉइश्चरायझर लावा, यामुळे ओलावा त्वचेमध्ये कोंडला जातो.

Dry Skin Care Tips | Agrowon

हर्बल फेसवॉश

पावसाळ्यात जास्त फेस येणारे किंवा तीव्र फेसवॉश वापरू नका, यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि पांढरी पडते.

Dry Skin Care Tips | Agrowon

मध आणि दुधाचा फेसपॅक

मध हे नैसर्गिक ह्युमेक्टंट आहे जे हवेतील ओलावा शोषून त्वचेला मऊ करते. दुधामुळे त्वचेचा राकटपणा कमी होतो.

Dry Skin Care Tips | Agrowon

Healthy Morning Drinks : दिवसाची सुरुवात चहाऐवजी 'या' ५ हेल्दी ड्रिंक्सने करा

Healthy Morning Drink | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...