Anuradha Vipat
पावसाळ्यात साचलेल्या स्वच्छ आणि दूषित पाण्यात डासांची उत्पत्ती वेगाने होते.
डेंग्यूचा डास प्रामुख्याने दिवसा चावतो, तर मलेरियाचा डास संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो.
घराभोवती, बागेत, गच्चीवर किंवा गॅलरीत कुठेही पाणी साचू देऊ नका.
कुलरमधील पाणी नियमित बदला. कुंड्यांच्या खालील ट्रे, जुने टायर, नारळाच्या करवंट्या, आणि प्लास्टिकच्या बाटल्या ताबडतोब नष्ट करा.
घरातील पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची भांडी नेहमी घट्ट झाकणाने झाकून ठेवा.
आठवड्यातून एकदा घरातील पाण्याचे सगळे ड्रम, टाक्या रिकाम्या करून, घासून वाळवून मगच पुन्हा भरा.
रात्री झोपताना, तसेच लहान मुलांना दुपारी झोपवताना नेहमी मच्छरदाणीचा वापर करा.