Anuradha Vipat
पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असला तरी या दिवसांत कपड्यांची योग्य निवड करणे खूप महत्त्वाचे असते.
पावसाळ्यात पॉलिस्टर, नायलॉन, रेयॉन किंवा ड्राय-फिट फॅब्रिकचे कपडे वापरणे फायदेशीर ठरते. हे कपडे पाणी कमी शोषतात आणि लवकर सुकतात.
कॉटनचे कपडे आरामदायी असले तरी ते पाणी पटकन शोषून घेतात आणि सुकायला जास्त वेळ लागतो.
पावसाळ्यात चिखलाचे डाग पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नेव्ही ब्लू, काळा, गडद हिरवा, ग्रे किंवा मरून यांसारखे रंग अधिक योग्य ठरतात.
जड फॅब्रिकचे कपडे भिजल्यानंतर अधिक वजनदार होतात. त्यामुळे हलक्या वजनाचे आणि सैलसर कपडे घातल्यास हालचाल करणे सोपे होते.
मॅक्सी ड्रेस, लांब पलाझो किंवा जमिनीला लागणाऱ्या पॅन्ट्स सहज भिजतात आणि चिखलाने खराब होतात.
हलक्या वजनाच्या डेनिम किंवा स्ट्रेचेबल फॅब्रिकची निवड अधिक सोयीस्कर ठरते.