Anuradha Vipat
पावसाळ्यात हवेतील थंड आणि दमट वातावरणामुळे सांध्यांमध्ये कडकपणा येतो आणि रक्तप्रवाह मंदावतो.
या ऋतूत पाठीच्या आणि मणक्याच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करा.
शेक दिल्यामुळे स्नायूंमधील कडकपणा कमी होतो, तिथला रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदनांपासून त्वरित आराम मिळतो.
पाठीला ताण देणारे हलके व्यायाम करा. 'भुजंगासन', 'मार्जरीआसन', आणि 'सेतूबंधासन' ही योगासने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा.
कोमट मोहरीचे तेल, तिळाचे तेल किंवा महानारायण तेलाने पाठीची आणि मणक्याची हलक्या हाताने मालिश करा.
पावसात भिजणे पूर्णपणे टाळा. घरात असतानाही थंड हवेपासून मणक्याचे रक्षण करण्यासाठी हलके उबदार कपडे वापरा.
वर्क फ्रॉम होम करताना किंवा ऑफिसमध्ये बसताना पाठीचा कणा नेहमी ताठ ठेवा. दर पाऊण तासाला सीटवरून उठून थोडे चाला.