Anuradha Vipat
'मोनोक्रोम' लूक म्हणजे वरपासून खालपर्यंत एकाच रंगाचे किंवा एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटांचे कपडे परिधान करणे.
आजच्या फॅशनच्या जगात हा 'मोनोक्रोम' लूक अत्यंत 'क्लासी', 'सिंपल' आणि 'पॉवरफुल' मानला जातो.
पूर्णपणे एकाच रंगाचे कपडे असताना लूक कंटाळवाणा वाटू नये म्हणून वेगवेगळ्या कापडांचा वापर करा.
'मोनोक्रोम' लूक करताना सिल्कचा टॉप आणि कॉटनची पँट किंवा लेदर स्कर्ट आणि लोकरीचे स्वेटर वापरा. कापडातील हा फरक लूकला अधिक स्टायलिश बनवतो.
मोनोक्रोम लूकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे तुम्ही उंच आणि सडपातळ दिसता.
एकावर एक लेयर्स घाला. यामुळे लूक अधिक आकर्षक वाटतो आणि रंगांची एकसुरीता तुटते.
जर तुम्ही पूर्ण लाल रंगाचा ड्रेस घातला असेल, तर बॅग किंवा चपला काळ्या किंवा न्यूड रंगाच्या निवडा.