Anuradha Vipat
हँडबॅग ही फॅशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. योग्य हँडबॅग निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे
लॅपटॉप, डायरी आणि इतर फाईल्स मावतील अशी मोठी 'टोट बॅग'किंवा 'सॅचेल' बॅग'किंवा निवडा.
लहान आणि स्टायलिश 'क्लच' किंवा 'स्लिंग बॅग' उत्तम आहे.
लेदर बॅगा टिकाऊ असतात तर कापडी बॅगा वजनाला हलक्या आणि धुवायला सोप्या असतात.
बॅग स्वतः वजनाला हलकी असावी. जर रिकामी बॅगच जड असेल, तर त्यात वस्तू भरल्यावर ती खांद्याला त्रास देऊ शकते.
जर तुम्ही रोजच्या वापरासाठी एकच बॅग घेणार असाल, तर काळा, तपकिरी , न्यूड किंवा नेव्ही ब्ल्यू यांसारखे 'न्यूट्रल' रंग निवडा.
बॅगमध्ये पुरेशा प्रमाणात कप्पे असावेत, जेणेकरून मोबाईल, चाव्या, पाकीट आणि मेकअपचे सामान वेगवेगळे ठेवता येईल.