Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार घरात पैसे न टिकण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
बुधवारी काही विशेष उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात पैसा टिकण्यास मदत होते.
बुधवार हा भगवान गणेशाला समर्पित दिवस आहे. या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला २१ दुर्वा अर्पण कराव्यात.
बुधवारी गोशाळेत जाऊन गाईंना हिरवा चारा, गवत किंवा हिरवी मूग डाळ खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते.
आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी किन्नरांना हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात .
बुधवारी घरात गहू दळताना त्यात थोडे हरभरे मिसळावेत. हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात बरकत येते.
बुधवारी गणपतीची पूजा करताना श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते