Anuradha Vipat
घरात मनी प्लांट लावल्याने सुख, समृद्धी आणि आर्थिक वृद्धी होते अशी मान्यता आहे.
मनी प्लांट चुकीच्या पद्धतीने लावल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये. या दिशेचा कारक बृहस्पतीआहे आणि मनी प्लांटचा संबंध शुक्राशी आहे.
मनी प्लांटच्या वेली जसे वर वाढतात, तशी घराची प्रगती होते. त्यामुळे या वेली कधीही जमिनीवर पसरू देऊ नका.
जर तुमच्या प्लांटची पाने सुकली असतील, तर ती लगेच कात्रीने कापून वेगळी करा. सुकलेली पाने घरात पैशांची चणचण निर्माण करतात.
मनी प्लांट घराच्या बाहेर, अंगणात किंवा मुख्य दाराबाहेर उघड्यावर लावणे टाळा. तो नेहमी घराच्या आत किंवा बाल्कनीमध्ये ठेवावा.
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरातील मनी प्लांट कधीही कोणाला भेट म्हणून देऊ नये आणि दुसऱ्याच्या घरातून चोरून किंवा मागून आणून लावू नये.