Anuradha Vipat
पैसे मॅनिफेस्ट करणे म्हणजे तुमच्या विचारांची शक्ती आणि कृती यांचा मेळ घालून आर्थिक समृद्धी आकर्षित करणे .
"मला खूप पैसे हवेत" म्हणण्याऐवजी "मला या महिन्याअखेर ५०,००० रुपये हवे आहेत" असा स्पष्ट आकडा मनात ठेवा.
हा मॅनिफेस्टेशनचा एक प्रभावी उपाय आहे. तुमचे ध्येय एका वहीत सलग ५ दिवस, दररोज ५५ वेळा लिहा.
वास्तुशास्त्र आणि मॅनिफेस्टेशननुसार, तुमचे पाकीट नेहमी व्यवस्थित ठेवा. त्यात फाटलेल्या नोटा किंवा रद्दी कागद ठेवू नका.
रोज शांत बसून डोळे मिटा आणि अशी कल्पना करा की तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत.
तुमच्याकडे सध्या जे काही आहे, त्यासाठी आभार माना. अशा विचारांमुळे तुम्ही सकारात्मक ऊर्जेत राहता.
मॅनिफेस्टेशन करताना मनात शंका ठेवू नका. "हे होईल की नाही?" असा विचार करण्याऐवजी "हे होत आहे" असा विश्वास ठेवा.