Anuradha Vipat
काळे तीळ पाण्यात टाकून अंघोळ करणे हे धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.
अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि साडेसाती कमी होतो .
शास्त्रांनुसार षटतिला एकादशी किंवा पौर्णिमेला तिळाच्या पाण्याने स्नान केल्याने अनवधानाने झालेल्या पापांतून मुक्ती मिळते.
शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मकतेचा संचार होतो.
तिळाच्या पाण्याने स्नान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषाची तीव्रता कमी होते.
काळ्या तिळाच्या पाण्याने स्नान केल्याने त्वचा मऊ आणि चमकदार होते. कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते
तीळ हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते .