Anuradha Vipat
हिंदू धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवार हा भगवान शंकराला समर्पित आहे.
सोमवार या दिवशी काही विशिष्ट धार्मिक उपाय किंवा पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ शकते
सोमवार या दिवशी धार्मिक उपाय किंवा पूजा केल्यास आर्थिक अडथळे दूर होऊ शकतात असा समज आहे.
आज आपण पाहूयात मालामाल होण्यासाठी सोमवारच्या दिवशी करता येणारे काही ज्योतिषीय उपाय.
दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर गाईच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करावा.
शिवलिंगावर दुधासोबतच बेलाची तीन पाने अर्पण करावीत. बेलाचे पान शंकराला अत्यंत प्रिय आहे
सोमवारच्या दिवशी रुद्राक्षाच्या माळेने किमान १०८ वेळा 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा.