Aslam Abdul Shanedivan
मोगरा मनमोहक सुगंधाबरोबरच अनेक आयुर्वेदिक फायदे देणारे फुल आहे.
मोगरा फुलामध्ये उत्कृष्ट मॉइश्चरायझिंग गुणधर्म असून ते त्वचेसाठी चांगले मानले जाते.
अनेकांना धाम येण्याची समस्या असते. अशावेळी मोगऱ्याचे फुल उत्तम पर्याय असून आपण घरीच बॉडी स्प्रे बनवू शकतो. यासाठी स्प्रे बाटलीमध्ये पाणी आणि मोगरा तेल मिसळू शकतो.
चेहऱ्यावर मुरुम किंवा पिंपल्सच्या समस्येमुळे अनेक त्रस्त असतात. अशावेळी मोगऱ्याच्या पाकळ्यांची पेस्ट आपण चेहऱ्यावर लावू शकतो.
केसांच्या आरोग्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा कंडिशनर म्हणून वापरू शकतो. यासाठी गरम पाण्यात मोगऱ्याची फुले टाकून पाणी थंड झाल्यावर केस धुण्यासाठी ते वापरू शकतो
गरम पाण्यात मोगऱ्याची फुले टाकून ते थंड झाल्यानंतर आपण गरजेनुसार टोनर म्हणून वापरू शकतो
अँटी-एजिंग स्किन केअर म्हणून मोगरा पाणी सर्वोत्तम आहे. याच्या वापराने त्वचेतील कोलेजन वाढून येणाऱ्या बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. (अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)