Anuradha Vipat
मॉड्युलर किचन डिझाईन करताना किचनमधील जागेचा योग्य वापर आणि वापरलेल्या साहित्याचा दर्जा या दोन गोष्टींवर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे असते.
सिंक , गॅस शेगडी आणि फ्रिज या तिन्हींमध्ये योग्य अंतर असावे. या तिन्ही गोष्टींमध्ये ६ ते ८ फुटांचे अंतर असावे.
किचनमध्ये पाण्याचा वापर जास्त असल्याने साधं प्लायवूड वापरू नका. त्याऐवजी BWP प्लायवूड किंवा HDHMR बोर्डचा वापर करा.
ड्रॉवर आणि कॅबिनेटसाठी नेहमी 'सॉफ्ट क्लोज' हायड्रॉलिक हिंजेस आणि चॅनेल्स वापरा. चांगल्या ब्रँड्सचे हार्डवेअर जास्त काळ टिकते.
ओट्याची उंची स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या उंचीनुसार साधारण ३२ ते ३४ इंच असावी.
किचनमधील धूर आणि तेलकटपणा कमी करण्यासाठी चांगल्या क्षमतेची इलेक्ट्रॉनिक चिमणी आवर्जून बसवा. मुख्य लाईटशिवाय, ओट्यावर पुरेसा प्रकाश पडण्यासाठी कॅबिनेटच्या खाली अंडर-कॅबिनेट एलईडी प्रोफाईल लाईट्स नक्की लावा.
एल-शेप किंवा यु-शेप किचनमध्ये कोपऱ्यातील जागा वाया जाऊ नये म्हणून 'मॅजिक कॉर्नर' किंवा 'कॅरोझल' ॲक्सेसरीज वापरा.