Kitchen Design Mistakes : मॉड्युलर किचन डिझाईन करताना कोणत्या चुका टाळाव्यात?

Anuradha Vipat

महत्त्व

मॉड्युलर किचन डिझाईन करताना सर्वात मोठी चूक म्हणजे किचनच्या केवळ दिसण्याला जास्त महत्त्व देणे.

Kitchen Design Mistakes | Agrowon

महत्त्वाचे

किचन सुंदर दिसणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच ते वापरताना सोयीस्कर असणे महत्त्वाचे आहे.

Kitchen Design Mistakes | Agrowon

'वर्क ट्रँगल'

काम सोपे होण्यासाठी सिंक , गॅस शेगडी आणि फ्रीज या तिन्ही गोष्टींमध्ये त्रिकोणी रचना असावी. यांच्यात जास्त अंतर असल्यास स्वयंपाक करताना खूप धावपळ होते.

Kitchen Design Mistakes | Agrowon

चुकीच्या मटेरिअलची निवड

बजेट वाचवण्यासाठी सिंकच्या खाली किंवा ओलावा असलेल्या भागात सामान्य MDF किंवा पार्टिकल बोर्ड वापरणे. हे बोर्ड पाण्यामुळे फुगतात आणि खराब होतात.

Kitchen Design Mistakes | agrowon

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू

किचन बनवून झाल्यानंतर चिमणी, मायक्रोवेव्ह, फ्रीज किंवा वॉटर प्युरिफायर खरेदी करणे. यामुळे नंतर कॅबिनेटमध्ये ते बसत नाहीत किंवा वायर बाहेर लटकतात.

Kitchen Design Mistakes | agrowon

अपुरे स्टोरेज

स्वयंपाकघरातील मोठे डबे, मिक्सर किंवा रोज लागणाऱ्या भांड्यांचा अंदाज न घेता सरसकट कॅबिनेट बनवणे.

Kitchen Design Mistakes | agrowon

अपुरा प्रकाश

फक्त छतावर एक मोठा दिवा लावणे. यामुळे ओट्यावर काम करताना पाठीमागून प्रकाश येतो आणि समोर सावली पडते.

Kitchen Design Mistakes | agrowon

Baby Massage Oil : नवजात बाळाला मसाज करण्यासाठी सर्वोत्तम तेल कोणते?

Baby Massage Oil | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...