Anuradha Vipat
सध्याच्या फॅशन जगतात दागिन्यांमध्ये पारंपरिक जुन्या डिझाईन्सना आधुनिक टच देण्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
रोजच्या वापरासाठी आणि ऑफिस वेअरसाठी हलक्या वजनाचे, नाजूक गळ्यातील चेन्स आणि ब्रेसलेट्सना महिलांची पहिली पसंती मिळत आहे.
वेस्टर्न आणि इंडियन लुकवर मॅच होणारे इंडो-वेस्टर्न दागिने, जसे की अँटीक चोकर आणि डायमंड स्टडेड नेकलेस सध्या खूप लोकप्रिय आहेत.
लग्नसराईत कोल्हापुरी साज, ठुशी, लक्ष्मी हार आणि मोत्यांच्या नथीची क्रेझ कायम असून तिला नवीन डिझाईन्समध्ये सादर केले जात आहे.
केवळ मोठे कानातले किंवा चांदबाली घालून लुक कम्प्लीट करण्याचा ट्रेंड तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
गळ्याला घट्ट बसणारे आणि फुलांच्या नक्षीचे चोकर सध्या लग्नसराईत भारी ठरत आहेत.
एकापेक्षा जास्त पदर असलेल्या सोन्याच्या किंवा हिऱ्यांच्या चेन्स वेस्टर्न कपड्यांवर सुंदर दिसतात.