Anuradha Vipat
जर तुम्ही स्वत:साठी किंवा पत्नीसाठी मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल तर सध्या 'मिनिमलिस्टिक'आणि 'मॉडर्न' डिझाईन्स खूप लोकप्रिय आहेत.
आजकाल गळ्याला चिटकून राहणारी किंवा थोडीशी खाली असणारी शॉर्ट मंगळसूत्रे ट्रेंडमध्ये आहेत.
पारंपारिक वाट्यांच्या ऐवजी हिऱ्याचे किंवा अमेरिकन डायमंडचे पेंडंट असलेले मंगळसूत्र आधुनिक महिलांची पहिली पसंती आहे.
जर तुम्हाला गळ्यात मंगळसूत्र घालणे आवडत नसेल, तर 'मंगळसूत्र ब्रेसलेट' हा सर्वोत्तम पर्याय आहे.
अतिशय साधेपणा हवा असल्यास केवळ एका काळ्या मण्याचे आणि सोन्याच्या तारेचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
मंगळसूत्राच्या मध्यभागी स्वतःचे किंवा पतीच्या नावाचे पहिले अक्षर असलेले पेंडंट बनवून घेण्याचा ट्रेंड वाढला आहे
पारंपारिक नक्षीकामाऐवजी त्रिकोण, वर्तुळ किंवा फुलांच्या आधुनिक डिझाईन्स असलेले पेंडंट्स सध्या तरुण महिलांमध्ये लोकप्रिय आहेत.