Anuradha Vipat
पारंपरिक कोल्हापुरी ठुशी हा महाराष्ट्रातील दागिन्यांचा राजा मानला जातो.
हा गळ्यालगत बसणारा दागिना सोन्याच्या बारीक-बारीक मण्यांना एकत्र गुंफून तयार केला जातो.
मध्यभागी लावलेला लाल किंवा हिरवा खडा आणि खाली लटकणारे छोटे मोती या दागिन्याची शोभा अधिक वाढवतात.
ही डिझाईन दिसायला अतिशय भव्य आणि राजेशाही असते. यामध्ये मण्यांच्या तीन ते चार ओळी एकत्र जोडलेल्या असतात.
मोत्यांची चिंचपेटी आणि सोन्याचे मणी एकत्र करून तयार केलेली ही फ्युजन डिझाईन आहे.
या प्रकारात मण्यांचा आकार जवारीच्या किंवा जोंधळ्याच्या दाण्यासारखा लांबट आणि नाजूक असतो. ही ठुशी वजनाने हलकी आणि गळ्यात अत्यंत नाजूक दिसते.
ज्यांना जास्त भरगच्च डिझाईन नको असते, त्यांच्यासाठी मण्यांची एकच ओळ असलेली नाजूक एकदानी ठुशी परफेक्ट ठरते.