Anuradha Vipat
आज मोबाईल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपताना बेडवर जाईपर्यंत आपला हात मोबाईल स्क्रीनवरच असतो.
जर तुम्हालाही अनेकदा डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर त्याचे मुख्य कारण तुमच्या हातातील मोबाईल असू शकतो.
मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांना कोरडे करतो. यामुळे डोळे जळजळणे, अंधुक दिसणे आणि डोक्याच्या पुढच्या भागात तीव्र वेदना होणे सुरू होते.
ज्यांना आधीपासूनच मायग्रेनचा त्रास आहे, त्यांचा हा त्रास मोबाईलच्या अतिवापरामुळे अधिक वाढतो.
मोबाईलवर सतत सोशल मीडिया स्क्रोल करणे किंवा गेम खेळल्याने मेंदूला विश्रांती मिळत नाही. यामुळे डोक्याच्या दोन्ही बाजूंना आणि कपाळावर जडपणा जाणवू लागतो.
दर २० मिनिटांनी मोबाईल स्क्रीनवरून नजर हटवा आणि २० फूट दूर असलेल्या कोणत्याही वस्तूवर २० सेकंदांसाठी लक्ष केंद्रित करा.
मोबाईल नेहमी तुमच्या डोळ्यांच्या रेषेत धरून वापरण्याची सवै ठेवा. यामुळे मानेवर ताण येणार नाही आणि 'टेक्स्ट नेक' मुळे होणारी डोकेदुखी थांबेल.