Anuradha Vipat
आधुनिक जीवनशैलीत मोबाईल हा अविभाज्य भाग झाला असला तरी त्याचा अतिवापर शरीरावर आणि मनावर गंभीर दुष्परिणाम करतो.
तासनतास स्क्रीन पाहिल्यामुळे डोळे कोरडे होणे, खाज येणे आणि दृष्टी धूसर होते
मोबाईल पाहताना मान झुकवून राहिल्यामुळे मान, खांदे आणि पाठीच्या कण्यात तीव्र वेदना होतात.
तासनतास एका जागी बसून मोबाईल पाहिल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते. यामुळे लठ्ठपणा वाढतो.
मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका वाढू शकतो
मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होतो
स्मार्टफोनचे व्यसन नैराश्य , चिंता आणि चिडचिडेपणा वाढवण्यास कारणीभूत ठरते