Sanjana Hebbalkar
आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खात असतो. या अंब्याचे अनेक प्रकार आहेत. हापूस. पायरी, देवगड.
या अब्याचे खाद्यपदार्थ खाण्यात तर वापर होतोच मात्र अब्याचे काही औषधी गुण देखील आहेत.
हेच जाणून घेत एका शेतकऱ्याने भारतात जगातील सगळ्यात महागड्या आंब्याची लागवड केली आहे.
बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्याच टकनिया गावामधील एका सुरेंद्र सिंह नामक शेतकरी जगातील महागड्या अशा मियाजाकी आंब्याची शेती करत आहे.
या जातीच्या लागवडीच्या रोप त्यांनी जपानमधील मागवली आणि २०२१ मध्ये त्याची लागवड केली. त्यानंतर त्याल १२ फळे आल्याचं देखील ते सांगतात.
त्यांच्या शेतात अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळे देखील आहेत. या मायोजाकी आंब्यांला आंतराष्ट्रीय बाजरात १ लाख इतकी किंमत आहे.
भारतात या आंब्याची किंमत १० ते १५ हजार इतकी आहे. या झाडाच्या औषधी गुणत्वामुळे त्याची मागणी जास्त आहे