Swapnil Shinde
स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी बांधलेली इमारत आपण संसद भवन म्हणून वापरत होतो.
सोमवारी सर्व पक्षांच्या खासदारांनी जुन्या संसद भवनाला निरोप दिला. मंगळवारपासून संसदेचे कामकाज नव्या इमारतीत हलवण्यात आले आहे.
नवीन संसद भवन जुन्या संसद भवनापेक्षा अनेक अर्थांनी वेगळे आहे. हे मेड इन इंडिया संसद भवन आहे
संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामात वापरले जाणारे साहित्य देशाच्या विविध भागातून आणण्यात आले आहे. नवीन संसदेत महाराष्ट्राचे लाकूड, राजस्थानचे संगमरवरी, त्रिपुरा आणि मिर्झापूरचे बांबू आहेत.
आता नव्या संसदेच्या दोन्ही सभागृहात एकूण 1272 खासदार बसू शकणार आहेत.
संसदेच्या नवीन इमारतीमध्ये दृकश्राव्य प्रणाली आणि डेटा नेटवर्क सुविधांची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
बायोमेट्रिक, सदस्यांसाठी प्रचंड मल्टी मीडिया डिस्प्ले, स्वयंचलित कॅमेरा कंट्रोल आणि कमांड सेंटरची निर्मिती, पूर्णपणे पेपरलेस अशा सुविधा उपलब्ध आहेत.