Anuradha Vipat
जीन्स हा प्रत्येकाच्या कपाटातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि रोजच्या वापराचा कपडा आहे.
प्रत्येक ट्रेंड तुमच्या शरीराच्या आकाराला साजेसा असेलच असे नाही. ट्रेंडपेक्षा तुमच्या शरीराला काय शोभून दिसते हे महत्त्वाचे आहे.
जीन्सचे फॅब्रिक काही वेळा वापरल्यानंतर आणि धुतल्यानंतर थोडे सैल होते. त्यामुळे खरेदी करताना ती कंबरेपाशी परफेक्ट फिटिंगची असणे आवश्यक आहे.
१००% कॉटन असलेली डेनिम जीन्स कडक असते आणि ती जास्त टिकते. जास्त स्ट्रेच असलेली जीन्स लवकर सैल पडते आणि तिचा आकार बिघडतो.
लो-राईझ, मिड-राईझ की हाय-राईझ? तुमच्या कंबरेच्या रचनेनुसार योग्य राईझ निवडा.
मागचे खिसे खूप मोठे किंवा खूप दूर असतील, तर तुमचा हिप एरिया विनाकारण जाड दिसू लागतो.
वेगवेगळ्या ब्रँड्सचे साईझ चार्ट वेगवेगळे असतात. त्या उंचीनुसार तिची लांबी योग्य आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे.