Sugar Recovery: उसाचा साखर उतारा वाढवायचा? या १० चुका टाळा!

Swarali Pawar

फक्त टनेज नाही, उताराही महत्त्वाचा!

जास्त ऊस मिळाला म्हणजे साखर उताराही जास्त मिळेल असे नाही.
पाणी, खत, पक्वता आणि तोडणीचे योग्य नियोजन करून साखर उतारा वाढवता येतो.

Increase Sugar Recovery | Agrowon

तोडणीपूर्वी जास्त पाणी नको!

तोडणीच्या आधी गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास उसातील रस पातळ होऊ शकतो. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसारच पाण्याचे नियोजन करा.

Increase Sugar Recovery | Agrowon

नत्राचा अतिरेक टाळा!

जास्त नत्र दिल्यास उसाची शाकीय वाढ वाढते आणि पक्वतेवर परिणाम होऊ शकतो. ऊस पक्वतेकडे जाताना गरज नसताना खत देणे टाळा.

Increase Sugar Recovery | Agrowon

हिरवी पाने जास्त काढू नका!

चाऱ्यासाठी उसाची हिरवी पाने मोठ्या प्रमाणात काढल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पानतोड करणे टाळा.

Increase Sugar Recovery | Agrowon

ऊस जमिनीलगत तोडा!

उसाच्या खालच्या कांड्यांमध्ये पक्वता जास्त असते, त्यामुळे ऊस शक्य तितका जमिनीलगत तोडा. तोडणीनंतर ऊस जास्त वेळ शेतात न ठेवता लवकर कारखान्यात पोहोचवा.

Increase Sugar Recovery | Agrowon

तोडलेला ऊस

तोडणीनंतर ऊस जास्त वेळ उघड्यावर ठेवल्यास त्याची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते. तोडणी, वाहतूक आणि गाळप यामध्ये अनावश्यक विलंब टाळा.

Increase Sugar Recovery | Agrowon

१२ महिन्यांचा ऊस

उसाला जास्त दिवस शेतात ठेवले म्हणजे साखर उतारा त्याच प्रमाणात वाढेलच असे नाही. वाण, हंगाम आणि पक्वतेनुसार योग्य वेळी तोडणी करणे महत्त्वाचे आहे.

Increase Sugar Recovery | Agrowon

जमिनीची सुपीकता जपा!

सलग ऊस घेतल्यास जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता प्रभावित होऊ शकते. पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा वापर आणि वाणानुसार योग्य नियोजन करून उत्पादनासोबत साखर उताऱ्यावरही भर द्या.

Increase Sugar Recovery | Agrowon

Banana Farming Tips: एल निनोमध्ये केळी बाग वाचवा! उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी ८ उपाय

अधिक माहितीसाठी..