Banana Farming Tips: एल निनोमध्ये केळी बाग वाचवा! उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी ८ उपाय

Swarali Pawar

उष्णतेचा केळीवर परिणाम होतोय?

एल निनोमुळे तापमान वाढल्यास केळीच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. पाणी, आच्छादन आणि अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करून हा ताण कमी करता येतो.

Banana crop management | Agrowon

पाण्याचा ताण टाळा!

केळीला पाण्याची गरज जास्त असल्याने ठिबकद्वारे नियमित सिंचन करणे महत्त्वाचे आहे. पिकाची अवस्था, जमीन आणि बाष्पीभवनाचा वेग पाहून पाण्याचे नियोजन करा.

Banana crop management | Agrowon

जमिनीवर आच्छादन करा

केळीच्या दोन ओळींमधील मोकळ्या जागेत प्लास्टिक किंवा सेंद्रिय आच्छादनाचा वापर करा. यामुळे जमिनीतील ओलावा टिकतो, तापमान कमी राहते आणि तणांचे नियंत्रण करण्यास मदत होते.

Banana crop management | Agrowon

संतुलित खत व्यवस्थापन करा

प्रति झाड १० किलो शेणखत किंवा ५ किलो गांडूळ खत देऊन सेंद्रिय घटक वाढवा. ठिबकद्वारे खतांचा टप्प्याटप्प्याने वापर केल्यास अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करता येतो.

Banana crop management | Agrowon

सूक्ष्म अन्नद्रव्ये विसरू नका!

दुसऱ्या आणि चौथ्या महिन्यात ईडीटीए जस्त आणि लोहाची प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करता येते. पाचव्या आणि सातव्या महिन्यात झिंक सल्फेट व फेरस सल्फेटचा जमिनीतून वापर करता येतो.

Banana crop management | Agrowon

केओलिनचा थर द्या

उष्णतेमुळे पानांमधून पाण्याचे बाष्पीभवन वाढते, त्यामुळे केओलिनची फवारणी करता येते. ८० ग्रॅम केओलिन प्रति लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करण्याची शिफारस दिली आहे.

Banana crop management | Agrowon

घडांची विशेष काळजी घ्या

घड निसवल्यानंतर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट आणि युरियाची शिफारशीनुसार फवारणी करता येते. घडांना ६ टक्के छिद्रे असलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या लावून सूर्यकिरणांपासून संरक्षण करा.

Banana crop management | Agrowon

घडांना आधार द्या!

उष्णता आणि वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडण्याचा धोका वाढू शकतो. घडांना बांबू किंवा पॉलीप्रोपॅलीन पट्ट्यांचा आधार देऊन बागेचे नुकसान कमी करा.

Banana crop management

Chia Seed: कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे चिया पीक दुष्काळात फायदेशीर?

अधिक माहितीसाठी...