Anuradha Vipat
अशा काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सजावटीला साजेसा आरसा निवडू शकता.
आरसा तुमच्या जागेच्या आकारानुसार आणि गरजेनुसार निवडा.
आरशाची फ्रेम निवडताना घराच्या सजावटीशी मिळतीजुळती आणि टिकाऊ साहित्य निवडा.
आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते.
दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा लावणे टाळा. यामुळे घरात अशांतता येऊ शकते.
बेडरूममध्ये आरसा पलंगासमोर ठेवू नये असे केल्याने मानसिक ताण येऊ शकतो.
उच्च गुणवत्तेचा आरसा जास्त काळ टिकतो आणि कमी खराब होतो