Aslam Abdul Shanedivan
पुदीना खाल्याने त्याचे अनेक फायदे आपल्या शरिरास मिळतात. पुदिनाच्या सेवनाने उन्हाळ्यात डिहायड्रेशन तर हिवाळ्यात कफ पासून संरक्षण होतं.
अनेकांच्या घरात बऱ्यापैकी पुदीन्याची चटणी ही खायला मिळते. पण अनेकांना पुदिन्याचे पाणी पिण्याचे फायदे माहित नसतील. याचाही चांगलाच फायदा मिळतो.
पुदीनात विटॅमिन-ए, विटॅमिन-सी, पोटॅशियम, लोह, कॅलशियम, अँटी-वायरल, अँटी-मायक्रोबियल, अँटी-ऑक्सीडेंट आणि थायमिन से पोशक तत्वे आहेत. त्यामुळे याच्या सेवणाने अनेक फायदे मिळतात.
उन्हाळ्यात पुदीना खाल्याने डिहायड्रेशन पासून बचाव होतो. त्यामुळे पुदिन्याच्या चटणीबरोबरच त्याचे पाणी ही सेवन करणे लाभ दायक ठरते.
उन्हाळ्यात उन्हामुळे अनेकांना डोके दुखीची समस्या उद्भवते. त्यावेळी पुदीनाचे पाणी प्यावे. यामधील मेंथॉल आपले मसल्स मोकळे करतात.
तोंडाला वास आला तरिही पुदीनाची पाने खाल्याने तो नाहीसा होतो. तसेच पुदीनाचे पाणी प्याल्याने हिवाळ्यात कफ होण्याचे प्रमाण कमाी करता येत. यामुळे कफ होत नाही.
मसालेदार आणि चटकदार खाल्याने अनेकांना अॅसिडिटी होते. त्यावर पुदीना पाणी लाभ दायक ठरते. त्यातील मेंथॉल ही पोटातील दाहकता कमी करून ते थंड ठेवते.