sandeep Shirguppe
शरीरास थंडावा देणारी, वायूहारक, पाचक व वातानुलोमन म्हणून आयुर्वेदीक पुदिनाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून ओळख आहे.
पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याच्या सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते. डोकेदुखी, दातदुखी, वातविकारावर उपयुक्त आहे.
दीपक, पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात व कफ दोषहारक व कृमिनाशक म्हणून पुदिनाचा उपयोग होतो.
क्रीम, टूथपेस्ट, च्युइंगम, ब्रीद फ्रेशनर, कॅण्डी, कुकीज आणि केकमध्ये चॉकलेट निर्मितीमध्ये पुदिना वापरतात.
कॉस्मेटिक उत्पादने, ॲरोमाथेरपी आणि नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या कीटकनाशकांमध्ये वापर होतो.Mint Powder
सर्दी-खोकला व ताप जाणवत असेल तर पुदिना, तुळस व आले यांच्यापासून बनविलेला काढा गुणकारक आहे.
त्वचाविकारांवर पुदिन्याचा रस अत्यंत गुणकारी आहे. खरूज व नायटा यावर पुदिन्याचा पानाचा लेप फायदेशीर ठरतो.
पाने रोज खाल्याने मुखदुर्गंधी नाहीशी होऊन हिरड्या बळकट होतात. दात किडत नाहीत, जिभेवरील पांढरा थर कमी होऊन तोंड स्वच्छ व सुगंधी राहते.
पुदिन्याची पाने सुकवून त्याचे चूर्ण आहारामध्ये वापरल्यास हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, संधिवात, आमवात हे विकार दूर होण्यास मदत होते.