BharadDhanya Pike: कमी पाणी, कमी खत; यंदा भरडधान्याची शेती ठरू शकते फायदेशीर!

Swarali Pawar

यंदा भरडधान्याकडे का वळावे?

कमी पाऊस आणि खतटंचाईच्या शक्यतेमुळे भरडधान्ये उत्तम पर्याय ठरू शकतात. ही पिके कमी खर्चात आणि प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देतात.

Millet Farming | Agrowon

कमी पाण्यात तग धरणारी पिके

भरडधान्यांना भात, ऊस किंवा कापसाच्या तुलनेत खूप कमी पाणी लागते. म्हणूनच कोरडवाहू भागासाठी ही पिके अधिक उपयुक्त ठरतात.

Millet Farming | Agrowon

पोषणमूल्यांनी परिपूर्ण

बाजरी, नाचणी आणि इतर भरडधान्यांमध्ये फायबर, प्रथिने आणि खनिजे मुबलक असतात. आरोग्याबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे त्यांची मागणी वाढत आहे.

Millet Farming | Agrowon

उत्पादन खर्च कमी

या पिकांना कमी प्रमाणात रासायनिक खते आणि औषधांची गरज भासते. कीड-रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने कमी असल्याने खर्च वाचतो.

Millet Farming | Agrowon

हलक्या जमिनीसाठी योग्य पर्याय

मुरमाड आणि हलक्या जमिनीत बाजरी, नाचणी आणि वरई उत्तम येतात. कमी पावसातही ही पिके चांगली तग धरून राहतात.

Millet Farming | Agrowon

मध्यम जमिनीसाठी कोणती पिके?

मध्यम निचऱ्याच्या जमिनीत खरीप ज्वारी, राजगिरा आणि कोदरा चांगले उत्पादन देतात. नाचणीची वाढ आणि दाण्यांची गुणवत्ता देखील सुधारते.

Millet Farming | Agrowon

बाजारपेठेत वाढती मागणी

भरडधान्यांना आता 'सुपरफूड' म्हणून ओळख मिळत आहे. त्यामुळे बाजारात या पिकांना चांगला दर मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Millet Farming | Agrowon

ब्रँडिंगमुळे वाढेल नफा

सॉर्टिंग, ग्रेडिंग आणि पॅकेजिंग करून स्वतःचा ब्रँड तयार करा. योग्य बाजारपेठ मिळाल्यास भरडधान्य शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.

Millet Farming | Agrowon

Blueberry Farming: १० ते १५ वर्षे उत्पादन देणारे पीक; ब्लूबेरी शेतीकडे का वळावे?

Agrowon
अधिक माहितीसाठी...