Swarali Pawar
सूक्ष्म सिंचनात पाण्याचा प्रत्येक थेंब मोजून मुळांजवळ सोडला जातो. पाण्याची नासाडी न होता पिकांना जितके गरज आहे तितकेच पाणी मिळते. त्यामुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्रात शेती करता येते.
सूक्ष्म सिंचनाचे दोन मुख्य प्रकार आहेत. ठिबक सिंचन: पाणी थेट मुळांपर्यंत दिले जाते. सूक्ष्म तुषार सिंचन: पाण्याचे हलके तुषार पिकांवर पडतात.
गहू, हरभरा, कांदा, सूर्यफूल, बटाटा, मका, ज्वारी या सर्व पिकांसाठी सूक्ष्म सिंचन उत्तम आहे. भाजीपाला, मसाला व फळपिकांतही याचा परिणाम उत्तम दिसून येतो.
गादीवाफ्यावर लागवड करण्यापूर्वी इनलाईन नळी ठेवावी. दोन नळ्यांमध्ये 4.5 – 5 फूट अंतर ठेवावे. ड्रिपरचे अंतर 30–50 सेंमी आणि प्रवाह 2.4–4 लिटर/तास ठेवावा.
तुषार संचामध्ये अंतर 3×3 किंवा 4×4 मीटर ठेवावे. मायक्रो तुषार पद्धतीत 6×6 किंवा 10×10 मीटर अंतर ठेवता येते. या पद्धतीने पाणी वापर कार्यक्षमता 80–85% मिळते.
गादीवाफ्यावर हवा व पाण्याचे संतुलन योग्य राहते. तण नियंत्रण, फवारणी, खत देणे सोपे होते. पिकांची वाढ जलद होते व उत्पादन लक्षणीय वाढते.
ठिबक सिंचनातून युरिया, 13:0:45, 0:0:50 यांसारखी पाण्यात विरघळणारी खते थेट मुळांपर्यंत पोहोचतात. खतांची कार्यक्षमता 80–90% होते आणि वाढ मजबूत होते.
सूक्ष्म सिंचनाने पाण्यात 40–50% बचत होते आणि उत्पादनात 50–60% वाढ होते.
मजुरी आणि विजेचा खर्च कमी होतो, पिकांची गुणवत्ता सुधारते. कमी पाणी असले तरी अधिक क्षेत्रावर शेती करता येते