Swarali Pawar
थंडीत कोंबड्यांना जास्त कॅलरीची गरज असते. त्यांना दररोज २८००–२९०० किलो कॅलरी देणारा आहार द्यावा. १०० ग्रॅम खाद्य खाणाऱ्या कोंबडीला हिवाळ्यात १२०–१३० ग्रॅम खाद्य द्यावे.
मका, सूर्यफूल बिया, ज्वारी, बाजरी हे धान्य भरडून द्यावे. सोया तेल किंवा सूर्यफूल तेल ५–६% प्रमाणात मिसळावे. थंडी जास्त असल्यास २–३ दिवस गूळ पाणी द्यावे.
ऊर्जायुक्त आहारामुळे खाद्य वापर वाढतो. खर्च कमी करण्यासाठी व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्सचे प्रमाण अल्पकाळासाठी थोडे कमी करता येते, उत्पादनावर मोठा परिणाम होत नाही.
कुक्कुटशेडमध्ये फिडरसची संख्या वाढवल्यास कोंबड्यांना दूर फिरावे लागत नाही.
ऊर्जा वाचते आणि खाद्य सेवन वाढते, त्यामुळे वजन व स्वास्थ्य चांगले राहते.
हिवाळ्यात व्हायरसचा धोका वाढतो. व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, सेलेनियम किंवा मल्टीव्हिटॅमिन कंपनीने दिलेल्या प्रमाणात द्यावे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
थंडीमुळे कोंबड्यांना तणाव येतो आणि उत्पादन घटते. योग्य आहार + उब + सप्लीमेंट्स यामुळे शरीराचा ताण कमी होतो आणि वाढ सुधारते.
हिवाळ्यात कोंबड्या थंड पाणी पित नाहीत. पिण्यासाठी कोमट पाणी दिल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढते आणि पचन सुधारते.
हिवाळ्यात कोंबड्यांची काळजी म्हणजे ऊर्जायुक्त आहार, सप्लीमेंट्स, जास्त फिडरस आणि कोमट पाणी. हे नियम पाळल्यास थंडीचा परिणाम होत नाही आणि उत्पादन व नफा दोन्ही वाढतात.