Anuradha Vipat
प्रवासासाठी मेथी पराठा हा एक उत्तम पर्याय आहे कारण तो बराच वेळ मऊ राहतो आणि लवकर खराब होत नाही.
गव्हाचे पीठ, मेथी, बेसन, लाल तिखट, हळद, धने-जिरे पूड, हिंग, आलं-लसूण-मिरची पेस्ट, मीठ, ओवा, पांढरे तीळ, तेल किंवा तूप.
गव्हाचे पीठ, बेसन, चिरलेली मेथी आणि सर्व मसाले एकत्र करून घ्या. यात गरम तेल आणि दही घाला. दही घातल्यामुळे प्रवासात पराठे २ दिवस मऊ राहतात.
आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट पीठ मळून घ्या.मळलेल्या पीठाला थोडे तेल लावून १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या.
पराठे भाजल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम पराठे पॅक केल्यास त्यांना वाफ सुटून ते ओले होऊ शकतात.
थंड झालेले पराठे प्रथम पेपर नॅपकिन किंवा सुती कापडात गुंडाळा आणि मग अल्युमिनियम फॉईल किंवा एअर-टाईट डब्यात ठेवा.